किताबें करती हैं बातें बीते जमाने की दुनिया की, इंसानों की आज की, कल की एक एक पल की.. किताबें कुछ कहना चाहती हैं तुम्हारे पास रहना चाहती हैं..’ सफदर हाश्मींच्या या कवितेत पुस्तकं काय काय म्हणतात ते पुढे विस्ताराने मांडलंय. एकंदरच सुसंस्कृत माणसाच्या मनात पुस्तकांकरिता एक वेगळा कोपरा असतो. पुस्तकांना मनात आणि घरातही राहायचं आहे. पण खरंच आजकाल पुस्तकांना जागा असते? त्यांना घर असतं? ग्रंथदिन जवळ आला की माझ्या मनातली लहानशी सल अधिकच खुपायला लागते. अनेक प्रसंग आठवतात आणि वस्तुस्थितीही अस्वस्थ करीत असते. एक प्रसंग साधासाच! माझ्या एका मैत्रिणीच्या घराचा पुनर्विकास झाला. नव्या फ्लॅटमध्ये राहायला जाताना तिने विचारलं, ‘तुझ्या ग्रंथालयात चांगली पुस्तकं आणून देऊ का? घराच्या नव्या सुशोभीकरणात त्यांना जागा मिळेलसं दिसत नाही.’ हे विचारताना तिला त्रास होत होता. आणि तिला एकदम ‘हो’ म्हणता येत नाही याचा मलाही त्रास होत होता. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या विलेपाल्र्याच्या शाखेची मी अध्यक्ष आहे. ग्रंथांसाठी जागा नेहमी कमीच पडते. त्यामुळे ग्रंथपालांशी बोलून कोणती पुस्तकं घेता येतील ते ठरव...