Skip to main content

Posts

Showing posts from 2017

निर्धार - कुसुमाग्रज : Nirdhar Kusumagraj

समरभूमिचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरी रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||ध्रु.|| घोरपडीला दोर लावुनी पहाड़ दुर्घट चढलेले, तुटून पङता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले, खंदकांतल्या अंगारावर हासत खेळत पडलेले, बाप असे कळिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||१|| या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची, पहाड़ डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदा शिरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||२|| करवत कानस कुणी चालतो पिकवो कोणी शेतमळा, कलम कागदावरी राबवो धरो कुणी हातात तुळा, करात कंकण असो कुणाच्या वा भाळावर गंधतिळा, शिंग मनोय्रावरी वाजता उभी छावणी घरोघरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||३|| पोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे, स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजयावाचुन अंत नसे, श्रद्धा ह्रदयातील आमुची वज्राहुनी बलवंत असे, मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी ? रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? |...

किताबें करती हैं बातें बीते जमाने, की दुनिया की, इंसानों की

किताबें करती हैं बातें बीते जमाने की दुनिया की, इंसानों की आज की, कल की एक एक पल की.. किताबें कुछ कहना चाहती हैं तुम्हारे पास रहना चाहती हैं..’ सफदर हाश्मींच्या या कवितेत पुस्तकं काय काय म्हणतात ते पुढे विस्ताराने मांडलंय. एकंदरच सुसंस्कृत माणसाच्या मनात पुस्तकांकरिता एक वेगळा कोपरा असतो. पुस्तकांना मनात आणि घरातही राहायचं आहे. पण खरंच आजकाल पुस्तकांना जागा असते? त्यांना घर असतं? ग्रंथदिन जवळ आला की माझ्या मनातली लहानशी सल अधिकच खुपायला लागते. अनेक प्रसंग आठवतात आणि वस्तुस्थितीही अस्वस्थ करीत असते. एक प्रसंग साधासाच! माझ्या एका मैत्रिणीच्या घराचा पुनर्विकास झाला. नव्या फ्लॅटमध्ये राहायला जाताना तिने विचारलं, ‘तुझ्या ग्रंथालयात चांगली पुस्तकं आणून देऊ  का? घराच्या नव्या सुशोभीकरणात त्यांना जागा मिळेलसं दिसत नाही.’ हे विचारताना तिला त्रास होत होता. आणि तिला एकदम ‘हो’ म्हणता येत नाही याचा मलाही त्रास होत होता. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या विलेपाल्र्याच्या शाखेची मी अध्यक्ष आहे. ग्रंथांसाठी जागा नेहमी कमीच पडते. त्यामुळे ग्रंथपालांशी बोलून कोणती पुस्तकं घेता येतील ते ठरव...

देणा-याने देत जावे

देणा-याने देत जावे  घेणा-याने घेत जावे  हिरव्या पिवळ्या माळावरुनी  हिरवी पिवळी शाल घ्यावी  सह्याद्रीच्या कड्याकडून  छातीसाठी ढाल घ्यावी  वेड्यापिशा ढगाकडून  वेडेपिसे आकार घ्यावे  रक्तामधल्या प्रश्नासाठी  पृथ्वीकडून होकार घ्यावे  उसळलेल्या दर्याकडून  पिसाळलेली आयाळ घ्यावी  भरलेल्या भिमेकडून  तुकोबाची माळ घ्यावी  देणा-याने देत जावे  घेणा-याने घेत जावे  घेता घेता एक दिवस  देणा-याचे हात घ्यावे  -विंदा करंदीकर

लढलो कसे? लढू कसे?

मराठाकालीन लढायांपासून ते ‘गोवामुक्ती’पर्यंतच्या मोहिमांचा अभ्यास करून ‘सेनादलांच्या संपूर्ण क्षमतांचा आपण कधी वापरच केला नाही’, किंवा ‘तीन सेनादलांत अधिक संवाद हवा’, असे परखड निष्कर्ष काढणारे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झाले आहे. एका विद्यमान हवाईदल अधिकाऱ्यांनी ते लिहिले असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे.. भारताच्या स्वातंत्र्यानंतर झालेल्या युद्धांवर आजपर्यंत स्वतंत्रपणे आणि विस्तृत बरेच लिखाण झाले आहे. पण त्यात प्रामुख्याने तात्कालीन सेनाधिकाऱ्यांनी आपापल्या अनुभवांवर आधारित, काहीशा मर्यादित दृष्टिकोनातून लिहिलेली वर्णने आहेत. विद्यापीठीय पंडित आणि लष्करी अधिकारी या दोन्ही प्रकारच्या लिखाणात समग्र दृष्टीचा अभाव जाणवतो. त्यातही लष्करी इतिहास (मिलिटरी हिस्टरी) या दृष्टीने भारतात आजवर फारसे लिखाण झालेले नाही. परदेशांप्रमाणे मिलिटरी हिस्टरी ही विद्याशाखाही भारतात नावारूपास आलेली नाही. अगदी सेनादलांच्या आणि रेजिमेंट्सच्या नोंदींमध्येही सातत्य आणि परिपूर्णता नाही. तसेच त्या-त्या वेळच्या कारवाया आणि युद्धांतून घेतलेले धडे संकलित करून त्यातून एक राष्ट्रीय धोरण (डॉक्ट्रिन) तयार करण्याचा प...