अर्थशास्त्राच्या ‘नोबेल’चे यंदाचे मानकरी अँगस डेटन यांनी, भारतासारख्या देशातील वाढत्या गरिबीसाठी आíथक सुधारणांना जबाबदार धरणाऱ्यांचा युक्तिवाद त्यांच्याच गळ्यात तर घातलाच. पण त्याचबरोबर गरिबी झपाटय़ाने दूर झाल्याचे सरकारचे दावे किती फसवे आहेत, हेही दाखवून दिले.. ‘भारतीय सर्वसाधारणपणे फार उंच नसतात याचे कारण त्यांच्या जनुकांत नाही तर एकंदरच असलेल्या कुपोषणामध्ये आहे’, ‘व्यक्तीची उंची ही त्याच्या लहानपणी झालेल्या योग्य पोषणाची निदर्शक आहे’, ‘जे वृद्ध एकत्र कुटुंबात १८ वर्षांपेक्षा कमी तरुणांसमवेत राहतात त्यांना अधिक मनस्तापास तोंड द्यावे लागते’, ‘सरकारी आíथक धोरण आखणे तज्ज्ञांच्या ज्ञानापेक्षा लोकांच्या गरजांवर आधारित हवे’, ‘श्रीमंत देशांकडून गरीब देशांना दिल्या जाणाऱ्या मदतीमुळे उपायापेक्षा अपायच अधिक होतो..’, ‘ज्या व्यवस्थेत संपत्तीनिर्मितीचे नियंत्रण मूठभर लोकांच्या हाती असते त्या व्यवस्थेत श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी मोठय़ा प्रमाणावर वाढते..’ प्रथमदर्शनी ही सर्व निरीक्षणे कोणा एका समाजाभ्यासकाची वा ललित लेखकाची आहेत, असा समज झाल्यास काही गर नाही. परंतु ही सर्व ठोस मते सखोल अ...